School Holiday List: महाराष्ट्रात पावसाने अत्यंत रौद्ररूप धारण केलेले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यासाठी ‘रेड आणि ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आलेला आहे. या गंभीर परिस्थितीचा विचार करता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व जिल्हा प्रशासनाने मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी राज्यातील अनेक प्रमुख भागांतील शाळा आणि महाविद्यालयांना अधिकृत सुट्टीच (School Holiday ) देण्यात आली आहे.
School Holiday
पावसाचा वाढता जोर आणि सखल भागांत साचणारे पाणी पाहता प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे कडक आवाहन केले आहे.
७ जुलै रोजी शाळा-कॉलेज बंद असलेल्या जिल्ह्यांची यादी पहा
| जिल्हा / शहर | हवामान विभागाचा इशारा (Alert) | सुट्टीचा अधिकृत तपशील |
|---|---|---|
| मुंबई (BMC क्षेत्र) | रेड अलर्ट (Red Alert) | सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद राहणार |
| पुणे (७ तालुके) | रेड अलर्ट (Red Alert) | जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड आणि भोर |
| ठाणे जिल्हा | ऑरेंज अलर्ट (Orange Alert) | सर्व अंगणवाड्या, शाळा आणि कॉलेजेस बंद |
| पालघर जिल्हा | रेड अलर्ट (Red Alert) | शाळा, कॉलेजेस आणि अंगणवाड्यांना सुट्टी |
| रत्नागिरी व नाशिक | ढगफुटीचा इशारा |
शाळांमध्ये जिल्ह्यानुसार कुठे काय परिस्थिती आहे?
१. मुंबईत शाळा बंद; खासगी कंपन्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला जाहीर
मुंबई मध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अत्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सर्व शाळा आणि महाविद्यालये ७ जुलै रोजी पूर्णपणे बंद राहणार आहेत. यासोबतच, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि रेल्वे सेवेवरील ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने खासगी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ (WFH) लागू करण्याचे आवाहन केलेले आहेत.
२. पुणे जिल्ह्यातील ‘या’ ७ तालुक्यांमध्ये सुट्टी जाहीर
पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. घाटमाथ्यावरील अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊनच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड आणि भोर या ७ तालुक्यांमधील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहेत.
३. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत सर्व शाळा बंद
ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातही सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अफवांपासून सावधान (नवी मुंबई अपडेट): सोशल मीडियावर नवी मुंबईतील शाळा बंद असल्याचा एक खोटा परिपत्रक व्हायरल होतेय. नमुंमपाच्या शिक्षण उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी स्पष्ट केलेले आहेत की, पालकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेत आणि केवळ अधिकृत सूत्रांच्या माहितीवरच विसंबून राहावेत.
४. नाशिकमध्ये ढगफुटीचा शाळांना इशारा जाहीर
नाशिक शहरासह ग्रामीण भागातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिसरात ढगफुटीचा इशारा देण्यात आलाय. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा तर बंद राहतील, पण गर्दी टाळण्यासाठी स्थानिक आठवडे बाजारही पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय.
शाळा आणि सुरक्षेसाठी राज्यात १७ NDRF पथके तैनात
सध्या पावसाची बिकट परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत संवेदनशील भागात १७ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि ६ राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची पथके सज्ज ठेवण्यात आलेले आहे.
- मुंबई: ४ पथके
- पालघर आणि नागपूर: प्रत्येकी २ पथके
- पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर: प्रत्येकी १ पथक
सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्रश्न १: ७ जुलै २०२६ रोजी मुंबईतील सर्व शाळा बंद आहेत का? उत्तर: होय, हवामान खात्याच्या रेड अलर्टनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ७ जुलै रोजी मुंबईतील सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलला आहे.
प्रश्न २: पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शाळांना सुट्टी आहे का? उत्तर: नाही. पुणे जिल्ह्यातील केवळ ७ तालुक्यांमध्ये (जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, राजगड आणि भोर) शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे.
प्रश्न ३: नवी मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे का? उत्तर: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा बंद असल्याचा व्हायरल होणारा मेसेज खोटा फिरत होता. शिक्षण विभागाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलेले आहेत.
प्रश्न ४: खासगी कार्यालयांसाठी प्रशासनाने काय सूचना दिल्या आहेत? उत्तर: मुसळधार पावसामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होऊ नये. म्हणून प्रशासनाने खासगी कंपन्यांना शक्य असल्यास आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) देण्याचा सल्ला दिलेला आहे.